shivaji-marketyard 
पुणे

मानाचे आणि मंडळांच्या गणरायांचेही यंदा मंडपातच विसर्जन 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील गणेशोत्सवाचा समारोप म्हणजे विसर्जन मिरवणूक. लाखो भाविकांचे आकर्षण असलेली ही मिरवणूक यंदा कोरोनामुळे काढली जाणार नाही. मानाचे आणि प्रमुख गणपतींचे विसर्जन देखील मिरवणुकीविना उत्सव मंडपात करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. विसर्जनाच्या दिवशी महापौर सकाळी साडेदहा वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यातील मानाचे व प्रमुख मंडळे यंदा गणेशोत्सव आणि संबंधित धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करीत आहेत. या मंडळांचे गणेश विसर्जन देखील उत्सव मंडप व मंदिरातच होणार आहे. या बाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. या वेळी श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरीवाडा गणपतीचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन यांच्यासह नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी आदी उपस्थित होते. 
यंदा कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा केला. नागरिकांनीही घरीच गणरायाचे विसर्जन करावे. फिरत्या हौदांचा देखील उपयोग करावा. यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपेल, असे आवाहन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केले. लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सोमवारी (ता. 31) मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी एकत्रित केसरीवाड्यात आरती करून लोकमान्यांना मानवंदना देणार आहेत, असे या वेळी सांगण्यात आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणाचे किती वाजता विसर्जन 
कसबा गणपती - सकाळी 11.30 
श्री तांबडी जोगेश्वरी - दुपारी - 12.15 
श्री गुरुजी तालीम - दुपारी 1.00 
तुळशीबाग गणपती - दुपारी 1.45 
केसरीवाडा गणपती - दुपारी 2.30 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी - दुपारी 3.15 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई - सूर्यास्ताला 
अखिल मंडई मंडळ - सायं. 7.00 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT